26 जानेवारीपासून शाळेत वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका

मुंबई : शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. परिपाठातले इतर विषय वगळण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.

राज्यघटना आणि त्यातल्या मुल्यांप्रती मुलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 26 जानेवारीपासून राज्यातल्या प्रत्येक शाळेत राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं वाचन केलं जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलीय.

Loading...

सत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. मात्र तत्कालीन सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती.

दरम्यान,आता उद्धव ठाकरे सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानातली मूलतत्त्वं विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'