पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा रचला होता कट; एकाला अटक

टीम महाराष्ट्र देशा: कोईम्बतूर पोलिसांनी १९९८ च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे.

कोईम्बतूरमधील १९९८ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आलेला मोहम्मद रफिक सध्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसाय करत असून त्याने एका ट्रकचालकाशी फोनवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा बोलला होता. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद रफिकला अटक केली.

काय म्हणाला होता रफिक

१९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या कोईम्बतूर भेटीदरम्यान ज्याने बॉम्ब ठेवला होता त्याची मदत मी घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्याविरोधात टाडा, गुंडा अॅक्ट अशा विविध कायद्यांखाली गुन्हे दाखल असल्याचे रफिकने म्हटले होते.