सरकारच्या अपयशाची गाथा मांडण्यासाठीच जनसंघर्ष यात्रा – अशोक चव्हाण

ashok chawan

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात सामान्य लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लोकांशी संवाद साधून सरकारच्या अपयशाची गाथा मांडण्याबरोबरच भाजप-शिवसेना हे सत्ता राबविण्यास योग्य व विश्वासार्ह नाहीत हे पटवून देण्याकरिताच काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्यापासून राज्यभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक लोकांच्या जवळ जाईल तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसला राज्यात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापूरपासून होत आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे अशी यात्रा काढण्यात येणार आहे.