कॉंग्रेस आघाडीला गेल्या वेळेस पेक्षा दुप्पट जागा मिळणार : बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेस पक्षही मित्र पक्षांशी आघाडी करून लोकसभेचा पराभव विसरून सत्ताधरी भाजपला शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तर या विधानसभेला कॉंग्रेस आघाडी 160 जागा मिळतील असा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे नेते मोठया संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, आम्ही आभासी आकडा सांगत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मागील वेळेपेक्षा साधारण दुप्पट म्हणजे 160 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

यावेळी थोरात यांनी सरकार निष्क्रिय असल्याची टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसी समाजकरिता खूप काम केल्याचा दावा केला मात्र नेमके काय काम केले हे त्यांनी सांगत नाही.याउलट 2008मध्ये काँग्रेस सरकार असताना आम्ही ओबीसी समाजाला आरक्षण दिले, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...