राज्य शासनाचा गोंधळात गोंधळ; नियोजन नसल्याने इंदूमिल येथील पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

Nawab Malik

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदुमील स्मारक पायाभरणी कार्यक्रमाचे योग्य नियोजन नसल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात न आल्यामुळे राज्य सरकारने हा कार्यक्रम सध्या रद्द केलेला आहे.

या कार्यक्रमाची पुढील रूपरेषा सामाजिक न्याय मंत्रालय तथा एमएमआरडीए लवकरच घोषित करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार असे मत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :