शासनाचा गोंधळात गोंधळ; इंदुमिल पायाभरणी सोहळा रद्द झाल्याने खुद्द अजित पवारांना घ्यावी लागली माघार

Ajit Pawar

मुंबई : काल अचानक राज्य सरकारने इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पायभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि नव्या वादाला तोंड फुटले होते. कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून आंबेडकर चळवळीतील पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये देखील नाराजी पसरली होती.

तर, राज्याचा विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांना देखील आमंत्रण न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (18 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. या कार्यक्रमामुळे सकाळी ११ वाजल्यानंतरचे त्यांचे सर्व नियोजित बैठका व कार्यक्रम इंदुमिलमधील पायभरणीच्या कार्यक्रमासाठी रद्द करण्यात आले होते. त्यानुसार अजित पवार मुंबईला निघाले होते. तर, वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांना निरोप देण्यात आला. त्यामुळे अजित पवारांनी वाशीतुन माघारी फिरत पुण्याकडे परतले आहेत.

पायभरणी कार्यक्रमावरून रिपाइंने व्यक्त केली नाराजी!

इंदुमिलस्थळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी जनतेने लढा दिला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून दिल्लीत संसदेवर ही रिपब्लिकन पक्षाने धडक देऊन मागणी मंजूर केली.

त्यामुळे इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेत्यांना संघटनांना निमंत्रण द्यायचे होते.तसे न करता घाईत मुख्यमंत्र्यांनी एकटेच भूमीपूजन करण्याचा कार्यक्रम नियोजित केला होता का? मुख्यमंत्र्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम करावे आकसबुद्धीने रिपब्लिकन नेत्यांना टाळून रिपाइंचे महत्व कमी होणार नाही असे गौतम सोनवणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-