पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला कोर्टाची सशर्त परवानगी

टीम महाराष्ट्र देशा : ‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा सनबर्न फेस्टिव्हल होत आहे. पुणेकरांनी कितीही विरोध केला तरी न्यायालयानं आवाजाच्या मर्यादेचं नियम घालून या कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे याचं आयोजन करावं आणि 75 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देशही आयोजकांना दिलेत. तसंच या नियमांची आणि इतर कायदेशीर बाबींची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि राज्य सरकराची राहील असे निर्देशही हायकोर्टानं शुक्रवारी दिलेत.

दरम्यान,सनबर्न फेस्टिव्हल’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते असा आरोप देखील करण्यात येत आहे. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात त्यामुळे सनबर्न फेस्टिव्हल’ला परवानगी नाकारावी अशी मागणी यापूर्वीच अनेक संघटनानी केली आहे.

पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ – शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे – जवळकरांचे आणि १२ मावळा प्रांत असे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे ‘हब’ असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही असं काही संघटनांच म्हणणे आहे. त्यामुळे यंदा सनबर्न फेस्टिव्हल जोरात होणार की जरा दमानं हे पाहण्याचं ठरणार आहे.