कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांची प्रकृती गंभीर

varvara rao

पुणे: कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी व तमिळ साहित्यातील कवी वरवरा राव सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर, त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे. राव यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नी हेमलता, मुलगी पवना, अनाला, सहजा या देखील उपस्थित होत्या.

त्यांच्या पत्नी हेमलता म्हणाल्या, ‘वरवरा राव हे गेल्या दोन महिन्यांपासून गंभीर आजारी आहेत. तरी त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे उपचार त्यांच्या प्रकृतीकरिता प्रभावी व पुरेसे ठरणारे नाहीत. त्यासाठी त्यांना एखाद्या चांगल्या रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. राव यांना बोलताना त्रास होत असून त्यांची तब्येत २८ मे पासून ढासळत आहे. त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, त्यांना बरे वाटत नसताना देखील कारागृहात परत आणले गेले.’

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादा भुसे

दरम्यान, ‘कारागृहातील रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध नसून त्यांना अन्य रुग्णालयात दाखल करावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे’, असे देखील हेमलता म्हणाल्या. तर, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. तेलंगणा राज्य वेगळे व्हावे, यासाठी १९९६ पासून राव लढत होते. अशा वैचारिक व्यक्तीसाठी तेलंगणा सरकारने पुढे यावे, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

राव यांचा आतापर्यंत ५ वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांचे वय, तब्येत व कोरोनाचा पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी देखील कुटुंबाने केली आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे राव यांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

अशोक गेहलोत यांच्या अडचणी सुरुच,निकटवर्तीय उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाचे छापे