पोलिसांनी नि:पक्षपातीपणे काम केल्यास समाजाचा पाठिंबा मिळणार – विश्वास नांगरे-पाटील

Vishwas-Nangre-Patil

सातारा : रहिमतपूर सारख्या एेतिहासिक गावात पोलिसांनी चांगले वातावरण निर्माण केले आहे याचा मला अभिमान वाटतो. सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे त्याचबरोबर समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची तसेच समाजाची आहे. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे व त्यांच्या सहका-यांनी  सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेत त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. असे काम करायला चारित्र्य स्वच्छ असणे महत्वाचे असते. नि:पक्षपातीपणे भ्रष्टाचार मुक्त काम केले तर समाजाचा पाठिंबा मिळतो असे उद्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काढले.

रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथे रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान आयोजित केलेल्या परिसरातील पोलीस पाटील, महिला दक्षता समित्या व विविध क्षेत्रातील पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.