महाशिव आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्रमांतर्गत झाली ‘या’ मुद्य्यांवर चर्चा

blank

टीम महाराष्ट्र देशा : आज मुंबई येथे किमान समान कार्यक्रमअंतर्गत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न, शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय झाला. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून सकारात्मक पाऊल पडते आहे. महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीतून बाहेर काढून लोकशाहीचा सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेतील पेच प्रसंगानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्यास प्रस्ताव दिला. या पाश्वभूमीवर गेल्या तीन चार दिवसात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज वाय. बी. सी. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकी नंतर दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा दिला.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याआधी दोन्ही पक्षाची समिती काही महत्त्वाच्या मुद्य्यांवर चर्चा करेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जो पर्यंत पाठींब्याबाबत एकमत होत नाही तो पर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही. कारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक एकत्र लढले आहेत. त्यामुळे सत्तेतील वाटप कसे असणार यावर एकमत झाल की आम्ही निर्णय घेऊ. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. दरम्यान आज झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सदर बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न, शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय झाला.

महत्त्वाच्या बातम्या :