रंगत वाढणार! श्रीलंकाविरोधात कर्णधार धवनसोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरण्याची शक्यता

धवन

मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.

धवनचा नियमित सलामी जोडीदार रोहित देखील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असल्याने धवनला नवीन पार्टनर मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने आयपीएलमध्ये धमाल केलेल्या युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्क्ल, पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे. या तिघांपैकी कोणी एक धावनचा साथीदार असणार आहे.

मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP