मुंबई : आज मीडियाशी बोलताना संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. होळीच्या पाश्वर्भूमीवर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. म्हणाले, महाराष्ट्राचा जो रंग आहे, हा स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा रंग आहे, तो त्यांनी समजून घ्यावा. असे बोलत भाजपवर राऊतांनी निशाणा साधला.
यासह राऊत म्हणाले, आम्ही शब्द राखून आणि मोजून-मापून बोलतो. सध्या न बोललेलं बरं. कारण राजकारण इतका बिघडवून ठेवलेला आहे की, समोरच्या विरोधकांनी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, राजकारणातला विनोद, आणि महाराष्ट्राचं संवेदनशील मन, हे सर्व नष्ट करून टाकले आहे. त्यामुळे सध्या लोक घाबरत आहेत बोलताना, या महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं, हे दुर्दैवानं आमच्या भाजपच्या मित्रांनी केले असल्याचे संजय राऊत यांनी थेट आरोप केला.
तसेच संजय राऊत म्हणाले, भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. असे बोलत संजय राऊतांनी आपले मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या –