जिल्हाधिकारी म्हणतात, “बिनधास्त मारा चिकनवर ताव”

chicken

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात बर्ड फ्लुचा संसर्ग नाही बिनधास्त उकडून चिकन आणि अंडे खाऊ शकतात असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.यावेळी ते म्हणाले बर्ड फ्लुचा प्रादुर्भाव हिमालय प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील स्थलांतरित पक्षामध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात परभणी, बीड, लातूर काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहे. अनेक ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहे.मात्र यावर विश्वास ठेवू नका असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

ते म्हणाले , ‘कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांशी संबंधित आहे. यामुळे हा संसर्ग जिल्ह्यात येवू नये म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून तज्ञ डॉक्टरांची टिम तयार करुन उपाययोजना केल्या जात आहे. बर्ड फ्लु रोगाच्या नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय, औरंगाबाद येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली आहे.

अंडी व कुक्कुट मास किमान ७० डिग्री तापमानावर ३०मिनटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाने हे पूर्णत: सुरक्षित आहे. अर्धवट शिजलेली कच्ची अंडी किंवा चिकन खावू नका. बर्ड फ्लु रोगाबाबत शास्त्रीय माहीतीचा आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच हजार पशु ठेवणारे १२१ पोल्ट्री फार्म आहेत.

महत्वाच्या बातम्या