राज्यातला थंडीचा कडाका वाढला, विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशांपेक्षा कमी

winter

नाशिक : राज्यातला थंडीचा कडाका आणखी वाढला असून विदर्भाच्या काही भागातली थंडीची लाट कालही कायम होती. तापमापकातला पारा आणखी खाली आला. काल 7 अंश सेल्सीअस हे राज्यातलं सर्वात कमी तापमान गोंदिया, यवतमाळ आणि परभणीत नोंदवलं गेलं.

नागपुरातलं किमान तापमान 8 तर पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधलं 9 अंश सेल्सीअस होतं. विदर्भात काल बहुतांश ठिकाणी 10 अंशांपेक्षा कमीच किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमान मात्र सरासरीच्या आसपासच होतं. किमान तापमानात इतक्यात आणखी मोठी घट होणार नाही संच हवामानही कोरडंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे.

दरम्यान,नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. तसेच सकाळी गोदावरी नदीवर धुक्याची पांढरी चादर पसरली असल्याचे दिसून आले.

नाशिकमध्ये आठ दिवसांपूर्वी सलग दोन दिवस दाट धुक्याचा आनंद नाशिककरांनीं घेतला होता. त्यानंतर मात्र पारा 13 ते 15 अंश सेल्सिअसपर्यँत कायम राहिला. सध्या नाशिककर सकाळी आणि रात्री गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या