सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांची प्रॉपर्टी, देशमुखांची नाही; भाजपचा देशमुख कुटुंबावर हल्ला

Rameshappa Karad

लातूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम १५ तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी दिलाय. लातूरमध्ये आयोजित ७२ तासांच्या अन्नत्याग आंदोलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख जिल्ह्यात उपस्थित राहत नाही, तसेच जिल्ह्यातील समस्यांकडे त्यांचे लक्ष नसल्याचा आरोप कराड यांनी आपल्या भाषणात केला. लातूरला निवासी पालकमंत्री द्या अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असेही त्यांनी या वेळी सांगितले. कोरोनासारख्या संकटाच्या काळात असो की, अतिवृष्टीच्या काळात लातूरचे पालकमंत्री एसीतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अतिवृष्टीच्या काळात खासगी विमानाने लातूरमध्ये आलेल्या पालकमंत्र्यांना रात्री १० वाजता कोणते नुकसान दिसले असेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी तुम्ही राहले नाही तर, शेतकऱ्यांची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या