‘मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ यामध्येच व्यस्त आहेत’

गोपीचंद पडळकर

हिंगोली : नुकतेच भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे यांनी जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्या प्रकरणी चर्चेत आले होते. १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं पण त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उद्घाटन उरकून टाकलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये एकच वाद पेटला होता.

त्यांनतर आता पुन्हा गोपीचंद पडळकर हे आणखी एका पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी चर्चेत आले असून यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले असल्याने यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, राष्ट्रमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी देशात अनेक मंदिर निर्माण करून हिंदू संकृती आबादित ठेवली आहे. अशा महान पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरयांचा पुतळा हिंगोली जिल्यातील औंढा नागनाथ या ट्रस्टने मंदिराच्या पश्चिम द्वारावर्ती बसवला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन गेल्या वर्षभरापासून रखडले अस म्हणत उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी वेळ मिळाला नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ यामध्येच व्यस्त आहेत. त्यामुळे ते कदाचित येऊ शकले नसतील. म्हणून महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या वतीने महापराक्रमी श्रीमंत महाराजा मल्हाररावजी होळकर यांची जयंती १६ मार्चला असून, या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण औंढा नागनाथ येथे दुपारी एक वाजता मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये मी स्वतः जाणार असल्याचेही पडळकर यांनी म्हंटले आहे. दरम्यान, त्यांनी समाजातील लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे.

महत्वाच्या बातम्या