क्लिपची मोडतोड करण्यात आली आहे,चुकीचं बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करा : सीएम

Uddhav-Thackeray and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा- पराभव समोर दिसू लागल्याने शिवसेनेने स्तर सोडला. माझी क्लिप ऐकून मला आनंद झाला. पूर्ण क्लिप ऐकवली असती तर लोकांसमोर यांना जाता आलं नसतं. क्लिपची मोडतोड करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना कुठेही या नीतीचा वापर करण्याचा संदेश दिला नाही. मी बोलल्या वक्तव्यापैकी काहीही चुकीचं बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करा. मात्र निवडणूक आयोगाने ज्यांनी हि एडीट करून क्लिप वाजवली त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केली आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

Loading...

दरम्यान शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ