fbpx

टेमघर बाबत मजबुतीचा दावा पोकळ – आम आदमी पार्टी

टीम महाराष्ट्र देशा :  दोन वर्षापूर्वी राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे धोकादायक अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती देत जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता आणि आपचे नेते विजय पांढरे यांनी राज्यातील सर्व धरणांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची आवश्यकता असल्याचे मत दिले होते. या बाबत कंत्राटदाराला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता. या धरणांच्या दुरुस्तीसाठीचा खर्च जनतेच्या पैशांतून नव्हे तर कंत्राटदारांकडून वसूल करावा, अशी मागणीही केली होती.

२०१० मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. तेव्हा ग्राऊ टिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली होती. टेमघर धरणातून तब्बल ६०० लिटर पाण्याची प्रतिसेकंद गळती होत होती. सेकंदांचा हिशोब मांडला तर ते फारसे काही विशेष वाटत नाही. ही गळती दिवसांमध्ये मोजल्यास एका दिवसाचे ८६,४०० सेकंद म्हणजे दिवसाला ५,१८,४०,००० याचा अर्थ दिवसाला पाच कोटी अठरा लाख चाळीस हजार लिटर पाण्याची गळती होत होती. पुण्यात अंदाजे प्रती व्यक्ती प्रती दिन १४० लिटर पाणी दिले जाते. हाच हिशेब मांडला तर दिवसाला ३,७०,२८५ ( तीन लाख सत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी ) लोकांना पुरेले एवढे पाणी वाया जात आहे. डिसेंबर २०१६ मध्ये धरण रिकामे केले गेले परंतु जुलै २०१८ अखेर काम अपूर्ण आहे त्यामुळे टेमघर धरण पुन्हा एकदा रिकामे करावे लागणार आहे.

एकीकडे सिंचनासाठी आणि पुण्यातील अनेक भागात पाण्याची ओरड असताना हा सलग दुसऱ्यावर्षी पाणीसाठा सोडून देण्याची वेळ आली आहे. दुरूस्तीमुळे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार नसून ऑक्टोबर महिन्यात हे धरण कामांसाठी रिकामे करण्यात येणार आहे.यातून पुणेकर जनतेचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. याबाबत ठेकेदारावरील कारवाई प्रक्रिया सुद्धा अत्यंत धीम्या गतीने चालू असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. तसेच या कार्यकाळत ज्या मंत्र्यनी फायली वर सह्या केल्या व ठेकेदाराना पाठीशी घातले ते अजूनही मोकळे च आहेत.

या बाबत बोलताना “महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने सदर धरणाचे बांधकामाच्या दर्जा तपासणीत अत्यंत गंभीर तृटी असल्याचे शासनाला कळवले होते. पण त्याची चौकशी करण्याच्या मागणीची दखल सरकारने घेतलेली नाही, उलट त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असुन आता लिकेज / गळती थांबवण्यासाठी 100 कोटी खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीने फक्त गळती कमी होतील,पण धरणाची कमी झालेली मजबुती – ताकद काही सुधरणार नाही. निकृष्ट बांधकामामुळे कमी झालेली धरणाची मजबुती, ग्रौटिंग मुळे अजीबात सुधारत नाही. हे धरण कायम स्वरुपी कच्चे झाले आहे”असे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता आणि आपचे नेते विजय पांढरे यांनी सांगितले. ‘उलट ग्रौटिंगच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असतो असा अनुभव आहे’ अशी टिप्पणी केली.

 

1 Comment

Click here to post a comment