शहरातील आरोग्य केंद्राचे होणार कोविड सेंटर; ३६६ रुग्णांची होणार व्यवस्था

शहरातील आरोग्य केंद्राचे होणार कोविड सेंटर; ३६६ रुग्णांची होणार व्यवस्था

amc

औरंगाबाद : महापालिकेने शहराच्या विविध भागातील नऊ आरोग्य केंद्राचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नऊ केंद्र सुरु होणार आहे. या केंद्रामध्ये सुमारे ३६६ रुग्ण भरती होवून त्यांची व्यवस्था होणार आहे. असे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी सांगितले.

शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच धर्तीवर सुमारे ६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याचाच परिणाम कोरोना लसीकरण व चाचण्यांवर झाला. त्यामुळे पुन्हा डॉक्टर, परिचारीका, डाटा ऑपरेटर व इतर पदांसाठी नवीन भरती करण्यात येणार आहे. मात्र यावेळी देण्यात येणारे मानधन हे कमी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी एमबीबीएस डॉक्टरांना १ लाख रुपये मानधन दिल्या जात होते. त्याऐवजी आता ६० हजार तर बीएमएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना ५० हजार ऐवजी ३० हजार रुपये मानधन देण्याचे पालिकेने ठरवले आहे. परिचारीका व डाटा ऑपरेटरच्या मानधनात देखील बदल केला आहे, अशी माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.

यामुळे पुन्हा नव्याने भरती करायची होती तर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून का कमी केले, असा सवाल कमी केलेल्या कर्मचाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. कोरोना लसीकरण केंद्रावर यापूर्वी लस घेण्यासाठी नागरिकांची नोंदणी करताना डाटा ऑपरेटची भरती केली होती. मात्र आता यासाठी पालिकेच्या शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण सुद्धा घेतल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या