आमदाराने सुरु केलेल्या अन्नछाञात नगराध्यक्षा बनवत आहेत जेवन

तुळजापूर : तालुक्याचे भाजपा आमदार तथा माजीमंञी राणाजगजितसिंहपाटील यांच्या संकल्पनेतून तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील गोरगरीब तसेच ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपासमारीस सामोरे जावु लागू नये. म्हणून बुधवार दि 1 एप्रिल पासुन विश्वनाथ काँर्नर हाँटेल येथे अन्नदान उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम लाँकडाऊन संपेपर्यत चालु राहणार आहे.

यात अन्न बनविण्याचे काम स्वता नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे पती व दोन कन्यांसह करीत असल्याने आमदार नगराध्यक्षा कोरोना ग्रस्तांचा मदतीला धावल्याचे चिञ तुळजाई दारी दिसुन येत आहे.

युवा नेते विनोद (पिटु) गंगणे, श्री सचिन भैया रोचकरी नगराध्यक्ष व आनंद (दादा) कंदले यांच्या मार्गदर्शनाने तुळजापूर शहरा मधे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.तरी गरजु लोकांना व पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहान सआयोजकांनी केले आहे. हे अन्नदान बनविण्यासाठी नगराध्यक्षाअर्चना गंगणे त्यांचे पती विनोद गंगणे दोन मुली सहकार्य करीत आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, आनंदा कंदले, नगरसेवक श्री बापूसाहेब कणे, अभिजित कदम, श्रीनाथ शिंदे, तात्यासाहेब गुंड, हनुमंत पुजारी, समाधान जगताप, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.