मोहोळच्या जनतेची पसंती विधानसभेला भुमीपुत्राला की गेटकेनला?

मोहोळ – विधानसभा मतदार संघ २००९ साली अनुसुचीत जातीसाठी राखीव झाला आणि तेंव्हापासुन मतदारसंघाचे चित्रच पालटले आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

Loading...

२००९ साली माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, २०१४ साली अवघ्या पंधरा दिवसात रमेश कदम हे आमदार झाले. या दोघांना आमदार करण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे एकहाती वर्चस्व कारणीभुत होते, आजही राजन पाटील म्हणतेल ती पुर्व दिशा असे चित्र राष्ट्रवादीचे आहे.

परंतु जनता आता बाहेरील उमेदवाराला कंटाळली आहे. त्यामुळे आता उमेदवार स्थानीक असावा म्हणुन जनतेची मागणी असल्याची चर्चा आहे. बाहेरचा उमेदवार असला तर गेटकेन विरुध्द भुमीपुत्र असा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. .शिवसेनेन हा विधानसभा जिंकण्याच्या इराद्यान कंबर कसली आहे. स्थानीकांमधुन उच्च शिक्षीत असणारे , कोरी पाटी असणारे नागेश वनकळसे इच्छुक आहेत, त्याबरोबर सोलापुरचे नगरसेवक मनोज शेजवाळ हे ही स्पर्धेत आहेत. त्यांच्याबरोबरच उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार हेही इच्छुक असल्याचे समजत आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार अजुन गुलदस्त्यात आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी त्यांचा पत्ता अजुन ओपन केलेला नाही त्यामुळ त्यांच्या कडुन अधिकृत रित्या कोणताही उमेदवार पळा पळ करताना दिसत नाही. परंतु सुभाष जगताप, राहुल क्षिरसागर, निर्मला बावीकर यांची चर्चा सध्या होताना दिसत आहे.सगळीकडे एकहाती वर्चस्वामुळे शेवटच्या टप्यात राष्ट्रवादी आपले पत्ते बाहेर काढणार.

तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या खासदार धनंजय महाडीक , विजयराज डोंगरे यांच्या भीमा लोकशक्ती आघाडीने अपक्ष उमेदवार उभा करण्याची हलचाल सुरु केली आहे .

गत विधानसभेमध्ये भाजपाचे संजय क्षिरसागर ८ हजार मतानी पराभुत झाले होते. त्तामुळे त्यांनी हि कंबर कसली आहे. लढत जवळपास चौरंगी होण्याचे दिसु लागले आहे. विधानसभेला आता भुमीपुत्र की गेटकेन? याला सर्वपक्षीय नेते कसा उपाय काढणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...