पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!

औरंगाबाद : शशीकला पवार व त्याचे पती चुनीलाल पवार हे दोन्ही वृध्द दांपत्य गेल्या ४ वर्षापासून चिंचपुर वेणुताई वृध्दाश्रमातील साहेबराव दनके यांच्या कडे राहत होते. मागील वर्षी त्याचे पती चुनीलाल याचे वृद्धाश्रमात दुखद निधन झाले. त्यानंतर रविवारी (दि.२०) आजींचे निधन झाले. अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलांना फोनवर माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. समाजसेवक सुमित पंडीत यांना याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आजींवर अंत्यसंस्कार केले.

आपल्या पतीच्या निधनानंतर आजीला पॅरालिसिस झाला होता. परंतु पोटच्या मुलांनी नाकारल्यावर त्या आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दनके यांच्या कडे राहत होत्या. रविवारी अचानक त्यांची तब्येत जास्त झाल्यामे आजीचे दुखद निधन झाले. हि माहिती आजीच्या घरच्यांना दनके यांनी फोनवर दिली असता त्यांच्याकडुन काहिच उत्तर मिळाले नाही. दनके यांनी समाजसेवक सुमित पंडित यांना फोन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत मागितली. लगेचच माणुसकी समुहाच्या सभासदांनी मदतीचे हात पुढे करत अंत्यविधीसाठी मदतककार्य केले.

व रात्री साडेआठ वाजता हिंदु संस्कृती प्रमाने अंत्यविधी पार पडला. माणूसकी समुहाचे सुमित पंडीत यांनी आपल्त्यांया भावना मांडतांना सांगितले, आई वडीलांना दुःख देण्याचा आपल्याला काय अधिकार, ज्या आई-वडिलांनी  लहानाचे मोठे केले स्वतः दुःख सहन करून आपल्याला सुखाची सावली दिली. असे असताना आई-वडिलांना एकटे सोडून देणे ही माणुसकी नाही.  समाजात कोणीही आई-वडिलांना त्रास न देता त्यांची सेवा केली पाहिजे. ज्यांच्या मुळे आपण जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. अशी प्रतिक्रिया  त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या