गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना मिळत आहेत रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे धडे 

नवनाथ विभूते

जांभुळदरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानावर भर दिला आहे.  हाच धागा पकडुन पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातल्या  जांभुळदरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना रोबोटिक्स तंत्रज्ञान शिकविण्याचा वसा या शाळेचे शिक्षक नवनाथ विभुते यांनी घेतलाय.

ग्रामीण भागातील मुलांना रोबोटिक्सचे तंत्रज्ञान कळावे त्याचा प्रत्यक्षात सराव करता यावा. याकरता जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नवनाथ विभुते यांनी चौथी ते सातवीच्या मुलांना रोबोटिक्स चे धडे देण्यास सुरुवात केलीय.विभुते यांनी स्वखर्चातुन दोन किट विकत आणुन या मुलांना तंंत्रज्ञान,संकल्पन,डिझाईन ,प्रत्यक्ष जोडणीचे धडे दिलेत. स्टेम एज्युकेशन म्हणजे सायन्स,टेक्नाँलाँजी,इंजिनिअरिंग,गणित यावर आधारीत असलेल्या गोष्टीवर मुलांना रोबोटिक्स शिकविले जाते.

चालणारे कासव,ट्राय सायकल रोबोट,कलर सोर्ट रोबोट,बग रोबोट,क्रोक्क रोबोट असे विविध प्रकारचे रोबोट सध्या नवनाथ विभुते यांनी मुलांकडुन तयार करुन घेतले आहेत.याच बरोबर मोटर,बँटरी,टेस्टर,यांची जोडणी शिकविली जाते. अशा आगळया वेगळया शिक्षणामुळे इथली मुलेही भारावुन गेली आहेत

अचुकता ,वेग या वैशिष्टयांमुळे रोबोटचा वापर दैनंदिन जीवनात होणार आहे. यात शंका नाही.भविष्यात या क्षेत्रात संधी पाहता शालेय वयातच मुलांना या रोबोटिक्स तंत्राची ओळख व्हावी याकरता नवनाथ विभुते यांनी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरु केला.

भरमसाठ शुल्क असणा-या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते.या भ्रामक संकल्पनेतुन पालकांनी आता बाहेर यायला हव.जिल्हा परिषदेच्या शाळामध्येही आता तंत्रावर आधारित शिक्षण मिळु शकते हे नवनाथ विभुते यांनी दाखवुन दिले आहे. गरज ते ती सरकारी शाळाकडे आता डोळसपणे नजरेने बघण्याची.

महत्त्वाच्या बातम्या