तर मुख्यमंत्री पुन्हा राजकारणात दिसणार नाहीत- धनंजय मुंडे

dhananjay vr cm

टेंभुर्णी: धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

धनंजय मुंडे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना प्रेमाने सांगतो की तुमचे जेवढे वय नसेल तितका पवार साहेबांचा अनुभव आहे. पवार साहेबांवर जर तुम्ही टीका कराल तर जनता तुम्हाला हद्दपार करेल. तुम्ही पुन्हा कधी राजकारणात दिसणार नाही.

ते पुढे म्हणाले, भाजपला आता पराभव दिसू लागला आहे. विरोधी पक्षाला जनावराची उपमा देणे हे काही योग्य नव्हते. भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भाजपला ज्यांनी मोठे केले त्यांचाच विसर पडला आहे. कालच्या मेळाव्यातील बॅनरवर स्व. मुंडे यांचा फोटो नव्हता याचे दुखः वाटते. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांचेही फोटो नव्हते. जे स्वतःच्या नेत्यांविषयी इमानदार नाही ते जनतेविषयी इमानदार कसे राहतील?

हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.