…तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षात कोपर्डीतील अत्याचाराचा निकाल लावला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्षे झालीतरी निकाल लागलेला नाही. त्यामुळे आगामी काळात निकाल लावला गेला नाही तर 1 जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

बस स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी असणारा  सोईसुविधांचा वनवा, एसटी गाड्यांची अपुरी संख्या आणि त्यामुळे होणारे प्रवाशांचे हाल यांच्याविरोधात आज स्वारगेट एसटी आगरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यात सध्या सणासुधीचे दिवस चालू आहेत. मात्र सामान्य जनतेला एसटीने प्रवासासाठी सुविधा मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. सर्वच बस स्थानकांवर स्वच्छता करण्यात यावी तसेच गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या.