fbpx

मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार. असे वक्तव्य कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. टे माद्यामांशी बोलत होते.

गेल्या कित्तेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. भाजप प्रवेशा नंतर त्यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होती आखेर त्याला मुहूर्त लागला आहे. उद्या १६ जून रविवार सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा व्विस्तर होणार आहे. यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे जळगावचे आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागल्याचे समोर आले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने ते आज शिर्डीत दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माद्यामांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार असे वक्तव्य त्यांनी केले.

विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे यांना कृषी खातं दिले जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.