कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार

नागपूर : आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. या योजनेचा लाभ वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

Loading...

याशिवाय, यापूर्वी तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी दिल्यामुळे बर्‍याच अडचणी आल्या होत्या. त्यामुळे कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करायचे आहेत. यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याची आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवारांची निवड करण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका