मुख्यमंत्र्यांनी कोकणातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला

nitesh rane udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सुरवातीलाच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई मेट्रोच्या आरे जंगलातील कारशेडला स्थगिती दिली. त्यानंतर लगेच त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र राज्यावर असणारा कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्यांनी काही विकासकामांना स्थगितीदेखील दिली आहे. दरम्यान त्यांनी कोकणातील तीर्थक्षेत्रांच्या स्थळांच्या विकासकामांनादेखील स्थगिती दिली आहे.

मात्र त्यांच्या या निर्णयावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. ” कोकणातल्या मंदिर विकासाला स्थगिती देऊन सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या मातीशी गद्दारी केली आहे ! कोकणातल्या जनतेने सेनेवर नेहमी प्रेम केले.. आणि सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला!! याची किम्मत मोजावी लागणार!! असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.” असे ट्वीट राणे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यसरकारवर तब्बल पावणे सात लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या सर्व कर्जाची परत फेड कशा पद्धतीने करता येऊ शकते, याचा आढावा घेण्यात येत आहे, त्यासाठी लवकर श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. तसेच राज्याचा हितासाठी काही प्रकल्प आवश्यक आहे. तर काही प्रकल्प नंतर करता येतील का, याबाबत विचार करत आहोत. अशी माहिती काल राज्यमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :