संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा

athawale

टीम महाराष्ट्र देशा : ‘अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे भरीव मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र राज्यात सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावा.’ असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस या गावात अयोजित 5 व्या कळस कृषी प्रदर्शनाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसून ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका आठवले यांनी केली.

Loading...

यावेळी आठवले यांनी ‘शेतकरी जिंदाबादचा द्यायचा आहे नारा ; शेकऱ्यांच्या दुष्मनांचे वाजवायचे आहे बारा’ अशी कविताहि सादर केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेला नदीजोड प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती जमाती च्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग करून सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून त्याचा लाभ राज्यातील मराठा समाजाला होईल, असे आठवले म्हणाले.

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन बीजमाता राहीबाई पोफेरे यांनी केले. कळस कृषी प्रदर्शना मध्ये विविध शेती विषयक वस्तू नवीन तंत्रज्ञ गायी,बैल, घोडे आदी पशूंचे तसेच धान्य पिकांचे वाणांचे प्रदर्शन या कृषी प्रदर्शनात भरविण्यात आले असून या कळस कृषी प्रदर्शनला राज्य सरकार ने गतवर्षी महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून गौरविले असल्याची माहिती आयोजक छत्रपती युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'