मराठी नेटकऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या राजस्थान प्रेमावर टीका

devendra fadanvis

ठाणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीनिमित्त मीरारोड येथे झालेल्या कार्यक्रमात ‘जय राजस्थान’चा नारा देत राजस्थानी समाजासाठी भूखंड देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीपूर्वी राजस्थानी समाजाच्या नेत्यांनी होळीला तुम्हाला यावे लागेल अशी गळ घातली होती, त्यामुळे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या राजस्थानी होळी कार्यक्रमाला हजेरी लावण्यावरून ट्विटरवरून नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.

होळीच्या कार्यक्रमात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले ‘वर्षा’ हे तुमचेच घर आहे, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाने राजस्थान भवनासाठी भूखंड द्यावी अशी मागणी केली. या मागणीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राजस्थानमधून विविध कामांसाठी, उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून करण्यात आलेली ही मागणी योग्य असून या भूखंडासाठी जागा शोधावी, सरकार त्याला तत्काळ मंजुरी देईल असं आश्वासन दिल्याचं समजत आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने विरोधकांनी भाजपने मराठीचा खून केल्याचा आरोप केला आहे. मराठी अभिमान गीतामधील एक कडवे वगळल्याने विरोधक संतापले होते.