fbpx

‘मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. म्हणून न्यायालयानेचं त्यांना सुनावले’

cm devendra fadanvis and jayant patil

गोविंद पानसरे तसेच डॉ दाभोलकर हत्या प्रकरणात तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या संथगती तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. गृह विभागाची जबाबदारी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील न्यायालयाने सुनावले होते.

उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढल्याच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  ते म्हणाले. ”मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.’अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील ? 

‘मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. त्यामुळे न्यायालयानेचं त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की, एका पक्षाचे? असे ताशेरे न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढले आहेत. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्यामुळेच न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत,” असं जयंत पाटील म्हणाले. सांगली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”न्यायालयाने ओढलेल्या या ताशेऱ्यावरून मुख्यमंत्र्यानी गृहखाते कसे सांभाळले हे समजून येतं. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काशी सांभाळली याचं सर्टिकफिकेत न्यायालयाने दिलं आहे,” असंही ते म्हणाले.

गृह खात्यासह ११ खात्यांचा कारभार सांभाळता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा, राज्याचे मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे असतात, अशा शब्दात उच्च न्यायालयाने फडणवीसांना सुनावले आहे. तपासाकडे लक्ष देण्यास व तपासातील अडथळे दूर करायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही काय, असा जाब यावेळी न्या. धर्माधिकारी यांनी विचारला आहे.