मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत मुंबईचा सौदा केला : विखे-पाटील

vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा लाभ झाला आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने 10 हजार कोटींची डील केली असून त्यातील 5 हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत बिल्डरांचे हितसंबंध जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा थेट आरोप केला. मुंबई पालिकेने मुंबईच्या विकासासाठी तयार केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीऐवजी (डीसीआर) डेव्हलपमेंट कंट्रोल अॅॅण्ड प्रमोशन रूल्स (डीसीपीआर) लागू केला. मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमाकलीत केवळ 14 बदल केल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा खोटा असून या नियमावलीत 14 नव्हे तर एकूण 2500 बदल झाले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.Loading…
Loading...