मुख्यमंत्री आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत : संजय निरुपम

टीम महाराष्ट्र देशा : कमला मिल अग्नितांडव वरून सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही चालू आहेत. संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईमध्ये आगीमुळे 31 लोकांना जीव गमवावा लागलाय. मुंबई आगीच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणखी दुर्घटना होण्याची भीती आहे. पण मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत अस ट्वीट संजय निरुपम यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला आहे. विशेष म्हणजे पालिका सभागृहातच त्यांनी हा गंभीर आरोप केल्याने कमला मिल आग दुर्घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. अर्थात आयुक्तांनी या नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी हॉटेलमालकावरील कारवाई थांबवण्यासाठी थेट पालिका आयुक्तांवर दबाव टाकणारा नेता कोण ? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे एकंदरीत राजकीय आरोपा प्रत्यारोप सुरु आहेत.