‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही’ ; पडळकरांचा घणाघात

padalkar

मुंबई : आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजा करण्यात येत असती. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील पंढरपूरमध्ये दाखल झाले होते.

त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता भाजप नेते व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला. ‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही’, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलेले आहे. तसेच यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे.

जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघाल आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल आहे.

पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसले आहे.’ अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP