मुख्यमंत्र्यांनी स्वतः बांधावर जावं आणि जलदगतीने निर्णय घ्यावा; पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई:राज्यभर झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीवर पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे.मुंडे म्हणाल्या की “मुख्यमंत्र्यांनी स्वतः बांधावर जावं, जलदगतीने निर्णय घ्यावा. राज्यभराच्या बांधावर जाऊ शकत नाही हे मान्य, पण बांधापेक्षा शेतकऱ्यांपर्यंत निर्णय पोहोचणे महत्त्वाचं असल्याचं देखील पंकजा मुंडेंनी अधोरेखित केलं आहे.

त्याचबरोबर मी जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण सरकारविषयी बोलते,त्यामुळे मी कुणा एकाच्या विरोधात नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

मागील काही दिवसांपासून खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही पंकजा मुंडे म्हणतात, खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

त्याचबरोबर मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे. जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. त्यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण योजनेचा शेतकर्यांना फायदा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-