मराठयांवर खापर फोडू नका, अमित शहा मुंबईत असल्यानेच मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत – गायकवाड

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला जाण्याविषयी घातपात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले, हे सांगताना त्यांनी गुप्तचर खात्याच्या अहवालाचा हवाला दिला. मात्र, ते राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत असल्यानेच ते पंढरपूरला गेले नाहीत, अशी टीका संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घातपाती ठरवले, आंदोलन करणारे छत्रपतींचे मावळे नसल्याचं विधान काल त्यांनी केल आहे, असं वक्तव्य करत समाजाची बदनामी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी गायकवाड यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री हे घातपात होणार असल्याचा गुप्त अहवाल मिळाल्याचं सांगतात, मात्र हे स्वतः गृहमंत्री आहेत. मग अशाप्रकारे गुप्त अहवाल कसा काय सांगू शकतात ?, या आधी त्यांच्यावर हल्ला होण्याचा गुप्त अहवाल मिळाल्याचं त्यांनीच सांगितलं होतं, ते आज फुले शाहू आंबेडकरांच नाव घेत आहेत. खरंतर त्यांना ही नाव घेण्याचा काही अधिकार नाही. असंही प्रवीण गायकवाड यावेळी म्हणाले.