राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही

raj thakre vr cm

अहमदनगर: “राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही. आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक कसं घेऊ शकतात?”, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काल अहमदनगरला मनसेच्या आढावा बैठकीत उपस्थित केला.

मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात हवा गेली आणि त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. तसेच कांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला. शेतकरी आणि ग्रामीण समस्यांकडं दुर्लक्ष झाल्याचंही नांदगावकर यांनी मान्य केलं. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे २० एप्रिलपासून राज्यात दौरा काढणार आहेत.