मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची रेल्वेमंत्र्यानवर टीका तर राष्ट्रवादीच्या नेत्याने केले तोंडभरून कौतुक

Piyush Goyal

मुंबई : श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला केवळ 50% रेल्वे गाड्या देत आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केला. यावरून आता रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली असल्याचं दिसत आहे.

मात्र एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांना फैलावर घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ही वेळ टीका-टिप्पणीची नाही. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सध्या देशभरात रेल्वेगा्ड्या सोडण्यासाठी दबाव आहे. त्यांच्या प्रयत्नांची दाद देऊन सन्मान केला पाहिजे. मजुरांना घरी जाण्यासाठी ते ट्रेन उपलब्ध करून देत आहेत. त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे पटेल म्हणाले.

दरम्यान पटेल एकीकडे असे म्हणत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र रेल्वे मंत्र्यांना काम व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला 157 ट्रेनची आवश्यकता आहे, त्यातील 115 मुंबईत अपेक्षित आहेत. यापूर्वी रेल्वे उद्या किती ट्रेन देणार आहे हे कळवायचे आणि आम्ही त्यांना यादी द्यायचो. सध्या ईदचा सण असल्याने अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात आहेत त्यामुळे पियुष गोयल यांनी थोडे सबुरीने घ्यावे.

महत्वाच्या बातम्या

#Corona : परीक्षेसाठी एवढी लुडबूड का ? शिवसेनेने घेतला राज्यपालांचा समाचार

#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर 

चीनने दिले प्रत्युत्तर ! अमेरिका जाणूनबुजून चीनला बदनाम करतीये : परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा