Electric Car Launch | देशातील सर्वात स्वस्त आणि लहान इलेक्ट्रिक कार झाली लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रि कार (Electric Car) चा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी आपल्या कंपनीचे सर्वोत्तम इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोण लवकर लाँच करेल? यामध्ये देखील स्पर्धा सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील पीएमव्ही (PMV) इलेक्ट्रिकने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही एक मायक्रो इलेक्ट्रिक कार असून कंपनीने या कारचे नाव EaS-E असे ठेवले आहे. देशांमध्ये टाटा मोटर्स Tiago EV सर्वात स्वस्त कार आहे पण पीएमव्ही कंपनीची ही कार या गाडीला टक्कर देऊ शकते.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Car)

भारतामध्ये आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या आहेत. त्यामध्ये टाटा मोटर्स Tiago EV ही सर्वात स्वस्त कार होती. ज्याची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, पीएमव्ही या कंपनीद्वारे लाँच करण्यात येणारी Micro EaS-E ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कारण या कारची किंमत 4.79 लाख रुपये एवढी आहे.

PMV इलेक्ट्रिक कार (Electric Car) डायमेन्शन

PMV EaS-E ही एक मायक्रो कार आहे. जी 2,915 मिनी लांब आणि 1,157 रुंद आहे. त्याचबरोबर ही कार 1,600 मिमी उंच आहे. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 170 मीटर आहे. मिनी डायमेन्शन असल्यामुळे ही आकाराची कार सहजपणे हालचाली करू शकते.

PMV EaS-E ही मिनी इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 200 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. ही कार तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून सहजपणे नियंत्रित करू शकतात. तर ही कार PMSM इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवली जाते. या कालच्या बॅटरीला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तब्बल 4 तास लागतात.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रि कार (Electric Car) चा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी …

पुढे वाचा

Cars And Bike