आधार कार्ड काढण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क नियमबाह्य

पुणे: आधार कार्ड नवीन काढण्यास किंवा आधार कार्ड मध्ये काही बदल करायचा असेल तर त्यावर शुल्क आकारले जात नसल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेराव यांनी दिली आहे. त्याचबरोबर जी सेतू केंद्र शुल्क आकारतात ते नियमबाह्य आहे.

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी ई सेवा केंद्र शुल्क आकारात असल्याच्या अनेक तक्रारी सध्या येत आहेत त्यावर स्पष्टीकरण देताना पुरवठा अधिकार्यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क हे नियम बाह्य आहे. अश्या काही तक्रारी आल्या तर त्या सेतू केंद्रावर ताबडतोब कारवाई करणार असल्याची माहिती देखील दिनेश भालेराव यांनी दिली आहे.