नवी-दिल्ली : आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी(२८ सप्टें.)काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कन्हैय्या यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी कन्हैयावर टीकास्त्राचा प्रहार केला आहे.
गिरगिट के बदलते रंग ! जैसे ही राहुल बाबा इसको बाहर निकालेंगे
यह बंदा @BJP4India भी जोईन कर सकता है !
शॉक से गिर मात जाइएगा ! #KanhaiyaKumar #KanhaiyaKumarJoinsCongress pic.twitter.com/h8V9xH9fDy— Ashoke Pandit (@ashokepandit) September 29, 2021
व्हिडीओ ट्विटरला शेअर करत चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी त्याला कॅप्शन दिले आहे की,’सरड्याचे बदलते रंग’ असं म्हटलं आहे.’ तसेच ‘राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करु शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका’ असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अशोक पंडित यांनी यापूर्वी देखील राहुल गांधींच्या एका ट्वीटवरुन टोला लगावला होता. राहुल गांधी यांनी ट्वीट करत, ‘आपण सर्व भारत असून द्वेषावर विजय मिळवू’ असे म्हटले होते. यावर पंडित यांनी ‘आमच्यासाठी काँग्रेसमुक्त भारतच भारत आहे’ असे म्हणत टोला लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला