बाजार समितीवर पाटील-जगताप गटाचाच सभापती ?

बागल गटाला बसणार जोरदार धक्का?

करमाळा – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक त्रिशंकू झाल्यानंतर किंगमेकर ठरलेले शिंदे गट कोणाला पाठिंबा देणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी बाजार समितीचा सभापती पाटील-जगताप गटाच्या आघाडीचाच होणार असल्याची चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.
bagdure
करमाळा बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या आघाडीला १८ जागांपैकी ८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या गटाला ८ जागा मिळालेल्या आहेत तर किंगमेकर ठरलेल्या जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळालेल्या आहेत. सध्या पाटील-जगताप आघाडी आणि बागल गटांकडून शिंदे गटाने  पाठिंबा द्यावा यासाठी सभापती पदाची अॉफर आहे परंतु जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी अजून पर्यंत निर्णय घेतलेला नसला तरी शिंदे गट पाटील-जगताप आघाडीलाच पाठिंबा देईल अशी चर्चा सध्या  तालुकाभर सुरू आहे. तसे झाले तर माजी आमदार जयवंतराव जगताप किंवा शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांच्यापैकी एकजण बाजार समितीचा सभापती होऊ शकतो. तसेच असे जर झाले तर बागल गटाला खूप मोठा धक्का बसणार असून याचा थेट परिणाम आगामी विधानसभेला होऊ शकतो. सध्यातरी सभापती कुठल्या गटाचा होणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी पाटील-जगताप गटाचाच सभापती होणार अशी चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.
You might also like
Comments
Loading...