मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील

loksabha

टीम महाराष्ट्र देशा : मराठीला भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा मुद्दा मागे राहिला होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकार विचारात असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या भाषा विभागाकडून सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला आहे. अशी माहिती लोकसभेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असे सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले आहे.

सदर प्रस्ताव भाषिक तज्ज्ञांच्या समितीपुढे ठेवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या समितीने अभिजात दर्जा देण्याची शिफारस केली आहे. असे महेश शर्मा यांनी लोकसभेत सांगितले. तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे. मद्रास उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०१६ रोजी एका सामायिक आदेशाद्वारे या विषयात हस्तक्षेप करण्यास नकार देत सर्व याचिका निकाली काढल्या आहेत. मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे शर्मा म्हणाले.