केंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता

केंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता

sushant singh rajput

नवी दिल्ली : १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन संपवले होते. त्याच्या अचानक जाण्याने चाहता वर्गाला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या जीवन संपवण्यामागे काही बड्या लोकांचा हात असल्याचे आरोप केले गेले होते. यावरून अनेक महिने राजकारण तापले होते. मुंबई पोलीस, सीबीआय, एनसीबी यांच्या मार्फत देखील या प्रकरणाची चौकशी केली गेली.

या प्रकरणाने वेगवेगळे वळण घेतले होते. तर, अद्यापही या प्रकरणात ठोस कारण समोर आलेले नाही. आता, केंद्र सरकार एका नॅशनल अवॉर्डला सुशांत सिंह राजपूतचे नाव देण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा सद्या सुरु आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या ऍवार्डला त्याचे नाव देण्यात येईल याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

कॅप्टन कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. तसेच, केदारनाथ, छिछोरे या चित्रपटांमधील भूमिका देखील नावाजल्या गेल्या होत्या. या चित्रपटांमधील त्याच्या कामाला चाहत्यांनी पसंती दिली असली तरी विविध ऍवॉर्डमध्ये त्याला डावलण्यात आल्याने चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. आता त्याच्या नावानेच नॅशनल ऍवार्ड देण्याच्या चर्चा होत असल्याने चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

नुकतंच, मुंबईमधील दादा साहेब इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्समध्ये दिवगंत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट एक्टरने सन्मानित करण्यात आलं आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या दिल बेचारा साठी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या