महाराष्ट्रातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल- नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल- नरेंद्र मोदी

narendra modi -uddhav thackeray

मुंबई: महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी, कोकण, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक पुणे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसाने कोकणात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७१ जण बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्या उतरल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर बचावकार्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राला मदत मागितली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूरस्थितीवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ही पूरस्थिती लवकर आटोक्यात यावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

दरम्यान चिपळूण, पेढे, कर्जत, खेड, संगमेश्वर या ठिकाणी भयंकर पूरस्थिती झाली आली असून लोक जीव मुठीत घेऊन एकमेकांना सहकार्य करत आहेत. या ठिकाणचे मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून या भागातील संपर्क तुटला आहे. त्यामुळे रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत मदत व बचावकार्य सुरू आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या