भीमा कोरेगाव प्रकरणातील सत्य बाहेर पडू नये म्हणूनच केंद्र सरकारने ही ऍक्शन घेतली

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : ‘ एल्गार परिषद, भीमा कोरेगाव प्रकरणात काही निष्पाप लोकांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत. काहीना तुरुंगात टाकले आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्यावर हे गुन्हे दाखल केल्याच जे बोलले जात आहे. त्यात काहीतरी तथ्य आहे, सत्य बाहेर पडू नये म्हणूनच ते सर्व टाळण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

एल्गार परिषद, भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर केवळ २४ तासात केंद्र सरकारने ही केस राज्यसरकारकडून काढून घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. २५) माध्यमांशी संवाद साधत काही खुलासे केले आहेत.

Loading...

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र कमिटी नेमण्यात यावी. या कमिटीने या सबंध प्रकारणाची फेरतपासणी करावी. त्यातून सत्य बाहेर येईल आणि हीच मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर सत्य बाहेर आणण्यासाठी राज्य सरकारने जी काही पावले टाकली गेली ती केंद्र सरकारच्या गृहखात्याने थांबवली. याचा अर्थ केंद्र सरकारच्या या ऍक्शनवर संशय घ्यायला जागा आहे. अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच एनआयएचा कायदा आल्यानंतर केंद्राला काही जास्तीचे अधिकार आले आहेत हे मला मान्य आहे पण राज्य सरकारने जर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही पावले उचलली असतील तर केंद्राने घाईघाईने हे प्रकरण काढून घेण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की