पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही : सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : पीएमसी बँक घोटाळ्यात सर्वसामान्य खातेदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे खातेदार संतप्त झाले असून सरकार प्रती संताप व्यक्त करत आहेत. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी भाजप कार्यालया समोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. यावर निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

पीएमसी बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळयाशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही. मात्र खातेदारांची जबाबदारी केंद्र सरकार घेत आहे. लुटारूंनी बँक लुटली. मात्र सामान्य खातेदार अडकले आहेत. त्यामुळे या खातेदारांचा प्रश्न आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यातून काही तोडगा निघतो का यावर चर्चा करणार आहे. मात्र या सर्व प्रकरणाचा केंद्र सरकारशी काहीही सबंध नसल्याचं, सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा काय आहे प्रकरण ?

पीएमसी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवण्यात आली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आतापर्यंत या प्रकरणात जॉय थॉमस, वारियामसिंग, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या चौघांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये शनिवारपर्यंत साडेतीन हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने याप्रकरणात अधिक चौकशी करीत आणखी ५०० कोटींची मालमत्ता सील केली. यामध्ये कोणाच्या नावे किती मालमत्ता आहे याचा तपशील मात्र मिळू शकला नाही मात्र यामध्ये स्थावर मालमत्ता, बँक खाती यांचा समावेश असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

महत्वाच्या बातम्या