राफेल करार : केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली,पवारांचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा– राफेल कराराबाबत कोर्टाने काल महत्वपूर्ण निकाल दिल्यानंतर देखील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राफेल विमान खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. कॅगच्या अहवालाबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणी कॅगने अभ्यास केला असून संसदेच्या लोकलेखा समितीनेही मंजुरी दिली आहे, असं केंद्र सरकारने कोर्टात म्हटलं आहे. पण हे संपूर्णपणे खोटं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राफेल डीलच्या मुद्द्यावरून शिवसेना-कॉंग्रेस साथ साथ