किती कोळसा हवा आहे हे विचारण्यासाठी आधीच केंद्राने राज्याला पत्र लिहिले होते – दानवे

किती कोळसा हवा आहे हे विचारण्यासाठी आधीच केंद्राने राज्याला पत्र लिहिले होते - दानवे

नवी दिल्ली- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात निर्माण झालेल्या कोळसा संकटाला राज्य सरकारला दोष दिला आहे. त्यांनी म्हटले आहे कि दोन वर्षापासून राज्य सरकार केंद्र सरकारवरती विविध विषयासंदर्भात आरोप करत आहे. त्यामध्ये कोरोना , अतिवृष्टी , शेतकऱ्यांच्या समस्या , आरक्षणासंदर्भात असेल महाराष्ट्र सरकारचे हेच काम करते आहे असं दानवे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या मागणी पुरवठानुसार राज्ये केंद्राला किती कोळसा पाहिजे हे कळवत असतात परंतु त्यांच्याकडे पर्याप्त साठा असून सुद्धा त्यांचे असे म्हणणे आहे कि आमच्याकडे कोळसा नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पत्र लिहले होते कि विजेसाठी किती कोळश्याची गरज आहे परंतु महाराष्ट्र सरकारने  यासंदर्भात माहिती दिली नाही.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये विजेची मागणी वाढते त्यादृष्टीने आधीच तयारी करून ठेवली पाहिजे हि राज्य सरकारची जवाबदारी आहे. परंतु राज्य सरकार केंद्राला सांगते कि कोळसा नका पाठवू म्हणून. पुढे बोलताना दानवे म्हणाले,  राज्य सरकारने असे सांगितले आहे कि विजेचे संकट आम्ही राज्यावरती येऊ देणार नाही परंतु केंद्राकडे मुबलक प्रमाणात कोळसासाठा उपलब्ध आहे तसेच पुढे राज्य सरकार बाहेरून वीज खरेदी करण्यात जर काही हेतू असेल किवा कोणत्या मंत्र्याचा फायदा असेल तर त्याचा आणि आमचा काही एक संबध नाही असे दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या