संघर्ष करणाऱ्या छगन भुजबळांना संपविण्याचा जातीवादी सरकारचा डाव

NCP leader Chhagan Bhujbal.

नाशिक  : बहुजन समाजासाठी संघर्ष करणारे छगन भुजबळ यांच्यावर सध्याच्या जातीवादी व्यवस्थेकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असून त्यांना संपविण्याचा डाव असल्याच्या भावना नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांनी व्यक्त केल्या. माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवासस्थानी आज छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात अन्याय पे चर्चा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार जयवंतराव जाधव, बाळासाहेब कडर्क, दिलीप खैरे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, सुषमा पगारे,वी, युगांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पगारे, सचिन मोगल, आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष प्रकाश पगारे, कैलास शेजवळ ,मनीष बस्ते ,पापभाई शेख,दिलीप प्रधान, राजु आहेर, विजय पगारे, विकास गायकवाड, मिलिंद हाडोरे, राहुल देवरे, मनीष वडनेरे, शेखर पगारे, सुमित साळवे, सुनील सुर्यवंशी, संदीप सोनवणे, भालचंद्र भुजबळ,नरेंद्र सोनवणे,चेतन बागुल,समाधान जेजुरकर आदीसह भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी महापौर अशोक दिवे पुढे म्हणाले की, छगन भुजबळ हे बहुजन समाजासाठी संघर्ष करणारे नेते असून जातीवादी व्यवस्थेकडून त्यांना संपविण्याचा डाव सुरु आहे. त्यांच्यावर होत असलेली कारवाई म्हणजे राज्यातील एक प्रखर छळवादाचे ज्वलंत उदाहरण आहे.

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना सध्या अडकविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्वांनी संघटीत होऊन भुजबळांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे पगारे, अशा तडवी, युगांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पगारे, आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष प्रकाश पगारे यांनी छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ चर्चा केली. या चर्चेतून आंदोलन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संघटीत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.